पदवीधरांच्या टाळूवरचं लोणी आणि आपलीच 'लाचार' शांतता!


अनेकांच्या एकजुटीतून उभी राहिलेली एक मोठी वज्रमुठ, जी एकता, संघर्ष आणि हक्कांच्या लढ्याचे प्रतीक आहे

जागे व्हा, एकत्र या, संघटित व्हा! आपल्या हक्कासाठी लढा!
प्रतिमा सौजन्य: सार्वजनिक डोमेन (Public Domain Illustration)

    प्रस्तावना: 

    राज्यात सध्या नोकरभरतीचा बाजार मांडलाय. कुठे पेपर फुटतात, कुठे आऊटसोर्सिंगच्या(बाह्यस्त्रोत) नावाखाली हक्काच्या जागा खासगी कंपन्यांच्या घशात घातल्या जातात, तर कुठे कंत्राटीकरणाचा फास तरुणांच्या गळ्याभोवती आवळला जातोय. पण दुर्दैव असं की, ज्या पदवीधरांनी या अन्यायाविरुद्ध पेटून उठायला हवं, तेच आज शांत आहेत. ही शांतता संयमाची नाही, तर ती मरगळलेली आहे!

    १. आपणच जबाबदार आहोत का? 

    हो, आपणच जबाबदार आहोत! 

    जेव्हा आपल्या डोळ्यांदेखत भरती प्रक्रियेत घोटाळे होतात आणि आपण केवळ सोशल मीडियावर 'कमेंट' करून शांत बसतो, तेव्हा आपणच भ्रष्टाचार करणाऱ्यांचे हात बळकट करत असतो. आपण प्रशासनाला जाब विचारला नाही, म्हणूनच त्यांना सुशिक्षितांच्या भविष्याशी खेळण्याचं धाडस होतंय.

    २. ताकद मोजण्याची वेळ आली आहे! 

    आम्ही 'मराठवाडा पदवीधर विचारमंच' च्या माध्यमातून एक महत्त्वाचा फॉर्म दिला आहे. हा केवळ माहितीसाठी नाही, तर आपली महाराष्ट्रातील  नक्की 'ताकद' किती आहे? हे या व्यवस्थेला दाखवून देण्याचं साधन आहे. जोपर्यंत आपण किती जण आहोत हेच समोर येत नाही, तोपर्यंत प्रशासनाला धारेवर धरता येणार नाही. 

    तुमची ही उदासीनता म्हणजेच अन्यायाला दिलेलं मूक संमतीपत्र आहे!

⚠️ महत्त्वाचे आवाहन!

आतापर्यंत ५००+ पदवीधरांनी ही माहिती वाचली आहे. पण जोपर्यंत तुम्ही खालील २ फॉर्म भरून आपली नोंदणी करत नाही, तोपर्यंत आपल्या या चळवळीला 'संख्याबळ' मिळणार नाही.

कृपया खाली स्क्रोल करा आणि दोन्ही फॉर्म नक्की भरा! 👇

    ३. मेळावे आणि चर्चासत्रे: 

    समस्येकडून तोडग्याकडे! केवळ तक्रार करून प्रश्न सुटणार नाहीत. आपण आपली एकजूट सिद्ध केल्यानंतर, आपण विभागवार 'पदवीधर मेळावे' आणि 'चर्चासत्रे' आयोजित करणार आहोत.

  • या चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञांसोबत बसून आऊटसोर्सिंगच्या जाचातून कशी सुटका करून घेता येईल, यावर मार्ग काढला जाईल.

  • आपल्या समस्यांवर 'कायमस्वरूपी तोडगा' काय असू शकतो, यावर सामूहिक विचारमंथन केले जाईल आणि प्रशासनाला तो स्वीकारण्यास भाग पाडले जाईल.

    आवाहन: 

    हे 'निखारे' अजूनही धगधगते आहेत, त्यांना विझू देऊ नका. जागे व्हा! तुमची पदवी जर तुम्हाला अन्यायाविरुद्ध बोलायला शिकवत नसेल, तर त्या कागदाच्या तुकड्याला काहीच अर्थ नाही. खालील फॉर्म भरा आणि सिद्ध करा की तुम्ही अजून जिवंत आहात!

-एक जबाबदार पदवीधर

(मराठवाडा पदवीधर विचारमंच)

    "फक्त वाचक म्हणून नका राहू, तर या चळवळीचा भाग व्हा! खालील फॉर्म भरा आणि आपली ताकद दाखवा."

⚠️ महत्त्वाचे आवाहन!

आतापर्यंत ५००+ पदवीधरांनी ही माहिती वाचली आहे. पण जोपर्यंत तुम्ही खालील २ फॉर्म भरून आपली नोंदणी करत नाही, तोपर्यंत आपल्या या चळवळीला 'संख्याबळ' मिळणार नाही.

कृपया खाली स्क्रोल करा आणि दोन्ही फॉर्म नक्की भरा! 👇

१. पदवीधर नोंदणी फॉर्म

२. पदवीधर ऑडिट फॉर्म


हे ही वाचा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंत्राटी भरती: पदवीधरांच्या कष्टाचे आधुनिक शोषण?

महाराष्ट्र पदवीधर व्हिजन डॉक्युमेंट : (२०२६-२०३०)

महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघ निवडणूक मार्गदर्शन!