About Us

मराठवाडा पदवीधर विचारमंच

महाराष्ट्रातील सुशिक्षित पदवीधरांच्या प्रगतीसाठी आणि न्याय्य हक्कासाठी समर्पित एक व्यापक वैचारिक चळवळ.

मराठवाडा पदवीधर विचारमंच ही केवळ एका विभागापुरती मर्यादित राहिलेली संस्था नसून, आज ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पदवीधरांचा आवाज बनली आहे. जरी या मंचाचा उगम मराठवाड्यातून झाला असला आणि हे आमचे मुख्य केंद्र असले, तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक पदवीधराला संघटित करणे आणि त्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडणे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे.

"मी एक पदवीधर, जो केवळ प्रस्थापित व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवण्यासाठी नाही, तर सुशिक्षित बेरोजगारांच्या हक्काचा आवाज बनण्यासाठी 'मराठवाडा पदवीधर विचारमंच' या माध्यमातून मैदानात उतरलो आहे. आजवर आपण आउटसोर्सिंगमधील बोगसगिरी, कंत्राटी पद्धतीमुळे होणारे तरुणांचे शोषण आणि सरकारी धोरणांमधील फोलपणा यावर प्रखर भूमिका मांडली आहे. माझा हा लढा कोणत्याही एका मर्यादित विषयापुरता नाही; जसे जसे प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेतील नवीन गैरप्रकार आणि पदवीधरांच्या विरोधातील नवीन मुद्दे समोर येतील, तसतसा हा लढा अधिक तीव्र आणि व्यापक केला जाईल.

अनेकांच्या मनात माझ्या ओळखीबद्दल आणि या मंचाच्या पुढील ठोस भूमिकेबद्दल कमालीची उत्सुकता आहे. हा वैचारिक संघर्ष आता एका निर्णायक वळणावर आला आहे. येत्या 1 मे रोजी 2026, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर किंवा त्यानंतर मी एक अधिकृत 'पत्रकार परिषद' (Press Conference) आयोजित करणार आहे. या परिषदेत मी स्वतः समोर येऊन माझी ओळख, आमची पुढील रणनीती आणि प्रत्येक ज्वलंत मुद्द्यावर आमची अधिकृत भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडणार आहे.

"संघटित व्हा, जागरूक व्हा आणि प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सज्ज व्हा!"

Marathwada Padvidhar Vichar Manch official logo representing a degree scroll with a gold seal.
मराठवाडा पदवीधर विचारमंच: पदवीधरांच्या हक्कासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध व्यासपीठ

आमची सविस्तर उद्दिष्टे आणि कार्यप्रणाली

१. रोजगार आणि नोकरी संधी

राज्यातील रिक्त असलेल्या शासकीय आणि निमशासकीय जागा तातडीने भरण्यासाठी पाठपुरावा करणे. खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधींचे विश्लेषण करून पदवीधरांना त्या उपलब्ध करून देणे.

२. उद्योजकता आणि स्टार्टअप

CMEGP, मुद्रा योजना आणि इतर शासकीय कर्ज योजनांचा लाभ पदवीधरांना मिळवून देण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करणे. सुशिक्षित तरुणांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहित करणे.

३. पदवीधर मतदारसंघाचे बळकटीकरण

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये सुशिक्षित, अभ्यासू आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी जागृती करणे आणि सक्रिय सहभाग नोंदवणे.

४. शैक्षणिक आणि सामाजिक धोरणे

राज्यातील शैक्षणिक धोरणांमध्ये पदवीधरांच्या हिताचे बदल घडवण्यासाठी शासनाला सूचना करणे आणि पदवीधरांच्या मानधनाबाबतच्या समस्या सोडवणे.

मंचाची व्याप्ती

मुख्य कार्यक्षेत्र: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड (मराठवाडा विभाग).

व्यापक विस्तार: पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागातील पदवीधरांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

"एक पाऊल पदवीधरांच्या हितासाठी, एक पाऊल महाराष्ट्राच्या भविष्यासाठी!"

© २०२६ मराठवाडा पदवीधर विचारमंच | महाराष्ट्र राज्य

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंत्राटी भरती: पदवीधरांच्या कष्टाचे आधुनिक शोषण?

महाराष्ट्र पदवीधर व्हिजन डॉक्युमेंट : (२०२६-२०३०)

महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघ निवडणूक मार्गदर्शन!